Ram Mandir News

Ram Mandir News Ram Mandir News

Ram Mandir : रविवारी आयोध्येला जाणारी आस्था ट्रेन वर दगडफेक झाली.सूरतहून रात्री आठच्या सुमारास ही ट्रेन अयोध्येला निघाली होती. ट्रेन नंदूरबार येथे पोहोचताच रात्री 10.45 च्या सुमारास अचानक दगडफेक सुरु झाली.त्यामुळे ट्रेनमधील प्रवासी घाबरले. त्यांनी तात्काळ ट्रेनचे दरवाजे, खिडक्या बंद केल्या. पण अनेक दगड ट्रेनमध्ये येऊन पडले. या दगडफेकीत कोणी जखमी झाले नाही.अयोध्येसाठी आस्था स्पेशल ट्रेन रविवारी रात्री 8 वाजता निघाली होती. एकूण 1340 प्रवासी या ट्रेनमध्ये होते. ट्रेनमधील प्रवाशी जेवल्यानंतर भजन करत झोपणार होते. पावणेअकराच्या सुमारास ट्रेन नंदूरबार येथे पोहोचली. इथे ट्रेन थांबताच अचानक दगडफेक सुरु झाली.अचानक झालेल्या या प्रकाराने प्रवासी घाबरले. त्यांनी लगेच दरवाजे, खिडक्या बंद केल्या. मात्र, तरीही अनेक दगड ट्रेनच्या आत येऊन पडले होते.

Leave a Comment