Pune Politics News : Vasant More

Pune Politics News : Vasant More Pune Politics News : Vasant More

Pune Politics News : पुण्यातील मनसेचे धडाकेबाज नेते अशी ओळख असलेल्या वसंत मोरे यांनी मोठा निर्णय घेत मनसेला राम-राम ठोकला. त्यांच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभा, दौरे, बैठका घेत असतानाच पुण्यात मोठा धक्का बसला आहे.वसंत मोरे नाराज असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. ते वारंवारं आपली नाराजी देखील व्यक्त करत असे. अशातच, आज सकाळी त्यांनी फेसबुक वरून पोस्ट लिहून नाराजी व्यक्त केली होती, त्यानंतर फेसबुक पोस्ट करत त्यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे.वसंत मोरे यांनी अनेकदा आपली खदखद व्यक्त केली होती. त्याचबरोबर वसंत मोरे वरिष्ठ नेत्यांवरही नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. त्यांनी आज सकाळी फेसबुकवरती एक पोस्ट केली होती, त्यानंतर दुपारी त्यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांचा राजीनामा राज ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Leave a Comment