PM Modi News : : PM Modi Ni Ghetala Cervical Cancer sati Motta Nirnay……
PM Modi नी घेतला सरव्हायकल कॅन्सरसाठी मोठा निर्णय… भारतात सरव्हायकल कॅन्सरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यावर आता मोदी सरकारनेही मोठे पाऊल उचलले आहे. पुनम पांडेच्या मृत्यूमुळे या आजाराबाबतआता अधिक बोललं जात आहे.मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी आरोग्य क्षेत्राबाबत अनेक मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये सरव्हायकल कॅन्सरसाठीही मोठा निर्णय घेण्यात आला.दरवर्षी सवा लाख महिलांना या आजाराशी लढावं लागतं आहे. आता पर्यंत 75 हजार लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. हे प्रमाण वाढत असल्याने केंद्र सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.सरकार आता 9 ते 14 वर्षीय मुलींना मोफत लस देणार आहे. या वयातील मुलींची संख्या देशात सध्या अंदाजे 8 कोटी आहे. याचे लसीकरण शाळेतच चालू केले जाणार आहे.