Mira Bhayandar Road मधे योगी स्टाइल कारवाई…

Mira Bhayandar Road मधे योगी स्टाइल कारवाई...

Mira Bhayandar Road मधे योगी स्टाइल कारवाई…

मीरा रोडच्या नया नगरमध्ये श्री राम शोभा यात्रेवर दगडफेक करणाऱ्या हल्लेखोरांवर सरकारने मोठी कारवाई केली आहे. श्री राम शोभा यात्रेवर दगडफेक करणाऱ्यांचे बेकायदा बांधकाम सरकारने बुलडोझर चालवून जमीनदोस्त केले आहे.अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लाच्या प्रतिष्ठापणेच्या आदल्याच दिवशी म्हणजेच रविवारी रात्री ठाण्यातील मीरा भायंदर परिसरात राडा झाला होता. या घटनेनंतर स्थानिक प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली आहे. हैदर चौकात असलेल्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. अनधिकृत बांधकाम भुईसपाट करण्यात आला आहे.या प्रकरणात आतापर्यंत 13 संशयित दंगलखोरांना अटक करण्यात आली आहे, तसेच 50 ते 60 अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उर्वरित आरोपींचा पोलिस कसून शोध घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. पोलिसांच्या हाती महत्त्वपूर्ण माहिती लागली आहे. आरोपींची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे.

Leave a Comment