Maldives Parliament मधे झाला नेत्यांचा राडा…
एमडीपीच्या एका नेत्याने सांगितले की, विरोधी पक्ष ‘द डेमोक्रॅट्स’च्या मदतीने त्यांनी महाभियोग प्रस्तावासाठी स्वाक्षऱ्या गोळा केल्या आहेत. आता ते सभापतींसमोर मांडल्या जाणार आहेत.चीनच्या फायद्यासाठी तिथल्या सरकारने ४ नवीन कायदे आणले आहेत. त्यावरून संसदेत पक्षाचे खासदार आणि विरोधकांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर सरकार समर्थक खासदारांनी निदर्शने केली, त्यामुळे संसदेचे कामकाजही विस्कळीत झाले. कंदिथिमुचे खासदार अब्दुल्ला शाहीन अब्दुल हकीम यांनी केंदिकूलहूधुचे खासदार अहमद ईशा यांना मारहाण केली, त्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. काही दिवसांपूर्वीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर मालदीवच्या ३ मंत्र्यांनी त्यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यानंतर तिघांनाही राजीनामा द्यावा लागला. लक्षद्वीपच्या जाहिरातीमुळे संतप्त झालेल्या मालदीवला चीनचा पाठिंबा मिळाला. पण, तेथील सामान्य जनता आणि विरोधी पक्षांचा भारताबद्दल चांगला दृष्टिकोन आहे.