Maharashtra News :- 22 जानेवारीला मिळणार सुट्टी…
22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण आणि प्रभू श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. हा सोहळा देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. हा ऐतिहासिक क्षण सर्वांना बघता यावा, यासाठी महाराष्ट्र सरकारकडून त्या दिवशी सुट्टी जाहीर केली आहे. छत्तीसगड, गोवा, ओडिशा, राजस्थान, आसाम, मध्य प्रदेश, हरियाणा या राज्यांत सार्वजनिक सुटी असणार आहे. तर केरळ, झारखंडमध्ये सुटीची मागणी करण्यात येत आहे. मात्र आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, तेलंगणा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान आणि निकोबार, दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, लडाख, लक्षद्वीप, पुद्दुचेरी येथे अद्याप सुटी जाहीर केलेली नाही.