Maharashtra News शेवटी मराठा आंदोलनाला मिळाल यश…
सध्या चालू आसलेल्या मराठा आंदोलनास मोठे यश मिळाल. राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या असून मध्यरात्री अध्यादेश देखील काढला. या अध्यादेशात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचाही समावेश करण्यात आला आहे.आज सकाळी ७ किंवा ८ च्या दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबईतील वाशी येथे दाखल होणार असून मनोज जरांगे त्यांच्या उपस्थितीत उपोषण सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एक मोठी विजयी सभा देखील मनोज जरांगे पाटलांची होणार आहे. या सभेची जोरदार तयारी सध्या सुरु आहे.महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी मनोज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावर आज तोडगा निघाला आहे. सरकारने तोडगा काढल्याने आंदोलन सुरू ठेवण्याची गरज नाही, असे मनोज जरांगे यांनी जाहीर केले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज जरांगे यांचे उपोषण ज्यूस पिऊन संपवतीलराज्य सरकारने मनोज जरांगे पाटलांनी केलेल्या सर्व मागण्या मान्य करून आज पहाटे सर्व अध्यादेश काढले असून आपल्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. सकाळी ८ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थित आपली विजयी सभा पार पडणार आहे.