Maharashtra News

Maharashtra News Maharashtra News

Maharashtra News : राज्यातील एसटी कर्मचारी १३ फेब्रुवारीपासून विभागीय पातळीवर उपोषण सुरू करणार आहेत.तसेच उपोषणानंतरही मागण्या मान्य न झाल्यास आगारपातळीवर ‘काम बंद’ आंदोलन सुरू करून एसटी सेवा बंद केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढ यांची थकबाकी देण्याबाबत १५ दिवसात मान्यताप्राप्त कामगार संघटनेसमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे सप्टेंबर २०२३ मध्ये मान्य केले होते.परंतु ४ महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतरही अद्याप बैठक झालेली नाही. त्यामुळे एसटी कामगार प्रचंड संतप्त झाले आहेत.एसटी कामगारांना सातवा वेतन आयोग लागू करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची प्रलंबित देणी या मागण्यांवर मान्यताप्राप्त संघटनेसमवेत चर्चा करून समितीने शासनास ६० दिवसात अहवाल सादर करण्याचे मान्य केले आहे.परंतु ६० दिवसांऐवजी ४ महिन्यांचा कालावधी संपूनही अहवाल सादर झालेला नाही, असे महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेकडून सांगण्‍यात आले.

Leave a Comment