Indian Navy News
Indian Navy : भारताने पुन्हा एकदा मोठा राजनैतिक विजय मिळवला आहे.सप्टेंबर 2023 मध्ये अल दहरा ग्लोबल कंपनीत काम करणाऱ्या 8 भारतीयांना अटक करण्यात आली होती, ऑक्टोबरमध्ये कतारच्या एका न्यायालयानं त्यांना थेट फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सातत्यानं भारत सरकारनं या माजी नौदल अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले होते. पुढे डिसेंबर 2023 मध्ये दुबईतील COP 28 परिषदेत पंतप्रधान मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी यांच्यामध्येही या मुद्द्यावर चर्चा झाली होती.कतार जेलमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या ‘त्या’ आठही भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांना मुक्त करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आठही भारतीय सुखरुप भारतात परतले आहेत.भारताची परराष्ट्रीय धोरणं आणि देशाचं जागतिक स्तरावर असणारं स्थान पाहता हा भारताच्या कुटनीतीचा मोठा विजय मानला जात आहे. खुद्द पंतप्रधान मोदींनी याप्रश्नी जातीनं लक्ष घातलं त्यामुळे सुखरुप भारतात परतलो अशी प्रतिक्रिया परतलेल्या सर्व भारतीयांनी दिली आहे.