Gaynvapi News : भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाची रिपोर्ट जाहीर…
काशी विश्वनाथ मंदिराला लागून असलेल्या ज्ञानवापी परिसरातील भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाची रिपोर्ट गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आली आहे. रिपोर्टनुसार, ज्ञानवापीमध्ये मंदिराचे स्ट्रक्चर भेटले आहे. यावरुन हिंदू पक्षकारांनी आनंद व्यक्त केला आहे. सर्वेक्षण रिपोर्टमधून सगळं स्पष्ट झालंय. मंदिर तोडून मशीद बांधण्यात आली आहे. त्यामुळे आता हिंदूंना पूजा-पाठ करण्याची परवानगी मिळायला हवी, अशी प्रतिक्रिया वकील विष्णू शंकर जैन यांनी दिली.ज्ञानवापी परिसराच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणचा रिपोर्ट ८३९ पानांचा आहे.
ASI च्या रिपोर्टनुसार, ज्ञानवापी परिसरात जनार्दन, रुद्र आणि विश्वेश्वराचे शिलालेख मिळाले आहेत. ASI ने 84 दिवसापासून सुरू आसलेल्या ज्ञानवापी परिसरात GPR , फोटोग्राफी , व्हिडिओग्राफी या सर्व गोष्टींवर सर्वेक्षण केले होते. 36 दिवसात हा अहवाल ASI ने तयार करण्यात आला आहे.