Flipkart Same Day Delivery…
” सकाळी ऑर्डर करा संध्याकाळपर्यंत प्रोडक्ट्स घरी ” हि सुविधा Flipkart या कंपनीकडून तयार करण्यात येत आहे. भारताच्या 20 प्रमुख शहरांत सुरू करण्यात येणार आहे. Flipkart ने दिलेल्या माहितीनुसार, जे ग्राहक दुपारी 1 वाजण्यापूर्वी ऑर्डर प्लेस करतील, त्यांना त्याच दिवशी रात्री 12 वाजण्याआधी प्रोडक्टची डिलिव्हरी देण्यात येईल.अहमदाबाद, बेंगळुरू, भुवनेश्वर, कोईम्बतूर, चेन्नई, दिल्ली, गुवाहटी, हैदराबाद, इंदूर, जयपूर, कोलकाता, लुधियाना, लखनऊ, मुंबई, नागपूर, पुणे, पाटणा, रायपूर, सिलीगुडी आणि विजयवाडा येथे फेब्रुवारीपासून याची सुविधा चालु होणार आहे आणि येत्या महिन्यांत हळूहळू संपूर्ण देशात अधिकाधिक ग्राहकांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.ग्राहकांना मोबाइल्स, फॅशन, ब्युटी प्रोडक्ट्स, लाइफस्टाईल, पुस्तके, होम अप्लायन्सेस आणि इलेक्ट्रॉनिक श्रेणीतील उत्पादनांची त्याच दिवशी डिलिव्हरीची सुविधा मिळेल. यामुळे ग्राहकांना आपल्या गरजेची अनेक उत्पादने त्याच दिवशी मिळणे शक्य होणार आहे.