Delhi News

Delhi News Delhi News : Farmers Protest

Delhi News : पहिल्या दिवसाप्रमाणे दुसऱ्या दिवशीही शेतकरी व जवानांमध्ये शंभू बॉर्डरवर झटपट झाल्याची पाहायला मिळाली.यात काही शेतकरी गंभीरीत्या जखमी सुध्दा झाले. शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेत येण्यापासून रोखण्याकरिता निमलष्करी दलांच्या जवानांचा सीमेवर पहारा आणखी कडक करण्यात आला आहे. दुसरीकडे, शेतकऱ्यांनीही दिल्लीकडे कूच करण्याची पूर्ण तयारी केली आहे.पंजाबमध्ये पोलिसांना ड्रोनद्वारे अश्रूधुराच्या नळकांड्या सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर आंदोलकांना रोखण्यासाठी सीमांवर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.भारतीय किसान संघाच्या राष्ट्रीय सरचिटणीस मोहिनी मिश्रा म्हणाल्या, शेतकरी संघटनांच्या ‘दिल्ली चलो’ मोर्चावर राजकारणाचा प्रभाव असल्याचे दिसून येत आहे.यापूर्वी सुध्दा अशाप्रकारे निवडणुकीपूर्वी आंदोलन छेडण्यात आले होते. हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असून कोणत्याही प्रकारच्या हिंसक आंदोलनाला आमचा विरोध आहे, असे मिश्रा यांनी म्हटले आहे.

Leave a Comment