Delhi News

Delhi News Delhi News

Delhi : १३ फेब्रुवारी रोजी ‘दिल्ली चलो’ची हाक शेतकरी संघटनांनी दिली आहे. यामध्ये सुमारे २०० शेतकरी संघटना सहभागी झाल्या आहेत.किमान आधारभूत किंमतीसह इतर मागण्यांसाठी सरकारवर दबाव निर्माण करण्याच्या उद्देशानं हा मोर्चा निघाला आहे. पण हरयाणातून निघालेल्या या शेतकऱ्यांना थोपवण्यासाठी दिल्ली-हरयाणा बॉर्डर सील करण्यात आलीए. तर हरयाणात इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीए.यापार्श्वभूमीवर हरयाणातील अंबाला, कुरुक्षेत्र, कैथाल, जिंद, हिस्सार, फतेहाबाद आणि सिरसा इथंली इंटरनेट सेवा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी बंद केली आहे.त्याचबरोबर बल्क एमएमएस आणि सर्व प्रकारच्या डोंगल इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये फक्त व्हॉईस कॉलची सेवाच सुरु राहणार आहे. ११ फेब्रुवारी सकाळी ६ वाजल्यापासून १३ फेब्रुवारी रात्री बारा वाजेपर्यंत ही इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.

Leave a Comment