Delhi Farmers News
Delhi Farmers News : शेतकरी आंदोलनाचा आज आठवा दिवस आहे. रविवारी रात्री उशिरा झालेल्या चौथ्या बैठकीत केंद्र सरकारने शेतकरी संघटनांसमोर पाच पिकांना हमीभाव देण्यास सहमती दर्शवली होती.त्याबाबतचा प्रस्ताव केंद्राने शेतकरी संघटनांसमोर ठेवला होता. त्यानुसार शेतकरी संघटनांनी या प्रस्तावावर विचार करत, आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्याबाबत वेळ मागितला होता. मात्र, आता सर्वच शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारचा पाच पिकांना हमीभाव देण्याचा प्रस्ताव नाकारला असून, 21 फेब्रुवारीपासून पुन्हा दिल्लीच्या दिशेने कूच करणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता उद्यापासून शेतकऱ्यांचे आंदोलन पुन्हा पेटणार आहे.शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी बैठकीनंतर माध्यमांसोबत बोलताना म्हटले आहे की, आम्ही शेतकरी संघटना आणि कृषी तज्ज्ञांसोबत सविस्तरपणे बोललो आहे. शेतकऱ्यांची मागणी ही सर्व पिकांना हमीभाव देणारा कायदा करण्याची आहे. त्यामुळे केंद्र सरकार सर्व पिकांना हमीभाव देण्यासाठी कायदा करत असेल. तर आम्ही आंदोलन संपवण्यास तयार आहोत. अन्यथा 21 फेब्रुवारीपासून पुन्हा दिल्लीच्या दिशेने शेतकरी आंदोलन तीव्र केले जाईल. असा इशाराही त्यांनी दिला आहे.