Ashok Chavan News
Ashok Chavan : अशोक चव्हाण यांचा काँग्रेस पक्षाला निरोप दिला.यांच्या या निर्णयाने पक्षातील सहकाऱ्यांनी धक्का बसल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. निवडणुका तोंडावर आल्या असताना मोठ्या नेत्यानेच पक्ष सोडल्या मुळे काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे.जन्मापासून आतापर्यंत काँग्रेस पक्षाचं काम केलं, आता अन्य पर्याय पाहिले पाहिजेत, अशा भावनेतून मी राजीनामा दिला आहे. काँग्रेस पक्षातील कोणत्याही आमदारासोबत माझी काही चर्चा झालेली नाही. राजकीय निर्णय पुढच्या दोन- ते तीन दिवसात घेईल, असं अशोक चव्हाण यांनी मीडियासोबत बोलताना सांगितलं., अशोक चव्हाण हे येत्या 15 फेब्रुवारीला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे. अशोक चव्हाणांनी यावर बोलताना अदयाप कोणताही निर्णय घेतला नाही असं म्हटलं होतं. आता काही दिवासातच सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. दोन दिवसांमध्ये अशोक चव्हाण आपली राजकीय भूमिका जाहीर करणार असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. मात्र दिल्लीतील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात जोरदार चर्चा आहे की केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्या दरम्यान अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील त्यांनी प्रवेश केल्यानंतर राज्यसभा उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.