Google pay वरुन आता घेता येईल कर्ज…
भारतात पैशाची देवाण घेवाण करण्यासाठी गूगल पे सर्रास वापरले जाते. मात्र आता तुम्ही गुगल पे द्वारे अगदी सहज कर्ज मिळवू शकणार आहे डीएमआय फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडने या कंपनीकडुन सोमवारी हे कर्ज गुगल पेद्वारे जारी करण्याचे सांगितले आहे.Google Pay द्वारे चांगल्या रक्कमेचे वैयक्तिक कर्ज सहज मिळवू शकता.परंतु तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की हे कर्ज सर्व व्यक्तींसाठी उपलब्ध नाही, ते फक्त चांगले क्रेडिट स्कोअर असलेल्यांनाच उपलब्ध आहे.Google आपल्या वापरकर्त्यांना हे कर्ज 36 महिन्यांच्या कालावधीसाठी म्हणजेच 3 वर्षांसाठी १ लाख रुपयांपर्यंत कर्ज देत आहे.