New York Times Square चौकात झळकणार श्री राम प्राणप्रतिष्टाचा सोहळा…

New York Times Square चौकात झळकणार श्री राम प्राणप्रतिष्टाचा सोहळा...

New York Times Square :- चौकात झळकणार श्री राम प्राणप्रतिष्टाचा सोहळा…

अयोध्येतील राम मंदिरात पार पडणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त देशभर जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळतेय. भाविकांच्या जय श्रीरामाच्या घोषणांनी अयोध्येतील रस्ते दुमदुमून गेले आहेत.परदेशात राहणाऱ्या रामभक्तांमध्येही प्रचंड उत्साह दिसून येत आहे. याची झलक अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरच्या चौकातही पाहायला मिळाली.अनेक भारतीय तेथील रस्त्यांवर हातात श्रीरामाचे भगवे झेंडे हातात घेऊन आनंदाने नाचताना दिसते. टाइम्स स्क्वेअरसमोर जणू रामभक्तांचा मेळा जमल्याचे दृश्यांमध्ये दिसतेय. यावेळी भारतीय महिलांनी राम आयेंगे गाण्यावर नृत्याचा आनंद घेतला. तसेच तबल्याच्या साथीने रामाची गाणी, भजन-कीर्तन म्हणत लोक आध्यात्मिक रंगात रंगून गेले आहेत.टाइम्स स्क्वेअरच्या मोठ्या होर्डिंगवर भगवान राम, सीतामाता व लक्ष्मण यांचे फोटो झळकत आहेत.

Leave a Comment