Iran & Pakistan युद्ध…
इराणच्या एलिट रिव्होल्युशनरी गार्ड्सने पाकिस्तानमधील बलुचिस्तान दहशतवादी गट जैश अल-अदलच्या दोन तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा केला . इराणच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. इराणनं क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या मदतीनं हल्ला केल्याची माहिती जैश अल-अदल गटाकडून देण्यात आली आहे. या हल्ल्यात जैश अल-अदलच्या सैनिकांची घरं उद्ध्वस्त झाली. तसेच त्याचे कुटुंबीय सुद्धा गंभीर जखमी झाले आणि दोन मुलं ठार आणि तीन जण जखमी झाली आहेत.या हल्ल्यात दहशतवादी गटाच्या मुख्यालयाला टार्गेट करण्यात आले आहे.