CAA Special News

CAA Special News CAA Special News

CAA Special News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने सोमवारी नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्याची घोषणा केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी CAA हा भाजपच्या जाहीरनाम्याचा अविभाज्य भाग होता. या निर्णयाचं केवळ देशभरातून नाही तर जगभरातुन स्वागत केल्या जात आहे. आता आफ्रिकन-अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका मेरी मिलबेनने यावर आपला पाठिंबा व्यक्त केला आहे. “हा शांततेचा मार्ग आहे,” हे लोकशाहीचे खरे कार्य आहे. असं ती म्हणाली.ट्विटरवरील अधिकृत पोस्टमध्ये, मिलबेन, ख्रिश्चन आणि धार्मिक स्वातंत्र्याचे समर्थक, यांनी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील गैर-मुस्लिम स्थलांतरितांना भारतीय राष्ट्रीयत्व बहाल केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. मेरी मिलबेनने लिहिले की, ‘एक ख्रिश्चन, विश्वासाची महिला आणि धार्मिक स्वातंत्र्याची जागतिक समर्थक म्हणून, मी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे आज नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याच्या अंमलबजावणीची घोषणा केल्याबद्दल कौतुक करते, ज्याचा आता विस्तार केला जात आहे. गैर-मुस्लिम स्थलांतरित, ख्रिश्चन, हिंदू यांना भारतीय राष्ट्रीयत्व प्रदान करते.

Leave a Comment