Pune News

Pune News Pune News

Pune News : सोमवारी सुमारे १०० कोटी रुपयांचे एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले होते. ही कारवाई ताजी असतानाच मंगळवारी सकाळी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत एका औषध निर्माण कंपनीत तब्बल ११०० कोटी रुपयांचे ६०० कीलो पेक्षा जास्त एमडी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे.काही दिवसांपूर्वी ललित पाटील प्रकरणात रांजणगाव औद्योगिक वसाहतीत एका कंपनीतून मोठ्या प्रमाणत ड्रग्स जप्त करण्यात आले होते.ड्रग्स तस्कर मिठाच्या आडून ही विक्री केली जात होती. ही कारवाई विश्रांतवाडी येथे करण्यात आली होती. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या ठिकाणी तब्बल ५२ किलो पेक्षा आधिक मेफेड्रॉन जप्त केले होते. या प्रकरणात या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. वैभव ऊर्फ पिंट्या भारत माने (रा. पुणे), अजय अमरनाथ करोसिया (वय ३५, रा. पुणे) आणि हैदर शेख (रा. विश्रांतवाडी) यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान यांच्या कडून गुन्हे शाखेच्या पथकाला कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत मोठ्या प्रमाणात ड्रग्स तयार होत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. Pune News

Leave a Comment