Nilesh Rane News
Nilesh Rane : भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. निलेश राणे यांची आज गुहागरमध्ये जाहीर सभा होणार होती. या सभेला विरोध करण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.निलेश राणे यांचा ताफा सभास्थळी जात असताना भास्कर जाधव यांचे कार्यकर्ते आडवे आले. यावेळी भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांमधील हा वाद इतका वाढला की, दोन्ही गटांकडून दगडफेक आणि घोषणाबाजी सुरू झाली. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. तसेच पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्यादेखील फोडल्या.