Pune News

Pune News Pune News

Pune : पुण्यातील येरवडा कारागृहामध्ये एका अधिकाऱ्याला आंदेकर टोळीच्या गुंडांनी बेदम मारहाण केली. कारागृहातील सुरक्षारक्षक आणि अधिकारी देखील सुरक्षित नसल्याचे या घटनेमुळे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. याप्रकरणी १० ते १२ जणांविरोधात येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटनेमध्ये कारागृह अधिकारी शेरखान पठाण हे जखमी झाले आहेत.दोन दिवसांपूर्वी दहा ते बारा कैदी आणि शेरखान पठाण यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती. त्यावेळी एकमेकांना शिवीगाळ करण्यात आलेली होती. त्यावरून ही धुसफूस सुरू होती. गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास पठाण यांच्यावर दहा ते बारा जणांच्या टोळक्याने हल्ला केला. पठाण यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली होती.

Leave a Comment