Automobile : Hero Mavrick 440
Automobile : हिरोची नवीन गाडी लॉन्च झाली ती म्हणजेच Hero Mavrick 440 आहे. कंपनीची आतापर्यंतची ही सर्वात शक्तिशाली आणि महागडी बाइक आहे. भारतात त्याची एक्स-शोरूम किंमत 1.99 लाख रुपयांपासून सुरू होईल. यापूर्वी, कंपनीने हीरो वर्ल्ड 2024 इव्हेंटमध्ये लॉन्च केली होती.Maverick 440 तीन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली. यामध्ये पहिली मिड आणि टॉप व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. बेस मॉडेलची किंमत 1.99 लाख रुपये आहे. तर मिड व्हर्जनची किंमत 2.14 लाख रुपये आणि टॉप मॉडेलची किंमत 2.24 लाख रुपये आहे. या सर्व एक्स-शोरूम किंमती आहेत. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि डायमंड-कट अलॉय व्हील टॉप व्हेरियंटमध्ये उपलब्ध असतील.Maverick 440 चे बुकिंग सुरु झालं आहे. Hero MotoCorp च्या अधिकृत वेबसाइट किंवा जवळच्या डीलरशिपला भेट देऊन तुम्ही Rs 5,000 मध्ये बुक करू शकता. कंपनी 15 एप्रिलपासून डिलिव्हरी सुरू करेल. कंपनीच्या वेबसाइटनुसार, 15 मार्च 2024 पूर्वीच्या सर्व बुकिंगसाठी, ग्राहकांना 10,000 रुपयांच्या ॲक्सेसरीज मिळेल.