Manoj Jarange Patil : News

Manoj Jarange Patil : News Manoj Jarange Patil : News

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे. पाचव्या दिवशी जरांगे पाटील यांची तब्येत अत्यंत खालावली होती. कार्यकर्त्यांच्या विनंतीनंतर त्यांनी उपचार घेतले.जरांगे पाटील गेल्या पाच दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. यादरम्यान त्यांची प्रकृती खालावली. त्यांना दोन सलाईन लावण्यात आल्या होत्या. तब्येत खालावल्याचं कळताच जरांगे पाटलांना भेटण्यासाठी अंतरवालीत मराठा समाजानं मोठी गर्दी केली होती. उपोषणाचा सहावा दिवस असून सगे सोयरे शब्दाची अमंलबजावणी होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार, असा निर्धार जरांगे पाटील यांनी केला आहे. सरकार अजून दखल घेत नसल्याने जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला ग्रामीण भागात पाठिंबा वाढत आहे. त्यांना पाठींबा देण्यासाठी हुबेहूब त्यांच्यासारखे दिसणारे अहमदनगरमधी हनुमंत मोरेदेखील उपोषणास बसणार आहे. हनुमंत मोरे यांच्या उपोषणास जामखेड शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीनेदेखील पाठिंबा देण्यात आला आहे. Manoj Jarange Patil News

Leave a Comment